कोलकाता : टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमी पुन्हा एकदा आपल्या पत्नीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं ट्रोलिंगचा शिकार ठरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं शमीनं हा क्षण साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.  



शमीची पत्नी हसीन जहाँ हिनं हिजाबशिवाय फोटो काढून ते सोशल मीडियावर करून मोठ्ठं 'पाप' केल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलंय.  


कुन्नामकुलमहून शारून या अकाऊंटवरून 'गो टू हेल' या हॅशटॅगसहीत शमीवर टीका केलीय. 'हिजाबशिवाय पत्नीला पाहून दु:ख झालंय. शमी सर पाप किती छोटं आहे हे पाहू नका... तर किती बेपर्वाईनं तुम्ही ते करत आहात ते पाहा' असं त्यानं म्हटलंय. 


तर बिजिंगहून सैय्यद अख्तरनं म्हटलंय, 'वाढदिवसाच्या दिवशी हिजाब न परिधान करता दक्षिणपंथियांना तुम्हाला खुश करायचंय का'


पाटण्याहून मोहम्मद ताहिर फैसल म्हणतोय 'लाजेनं चूर झालोय. तुम्ही मुसलमान आहात. मला तर वाटत नाही. इस्लाम या पद्धतीनं वाढदिवस साजरा करायला परवानगी देत नाही'


यानंतर शमीचे चाहतेही त्याच्या बचावासाठी उतरले. बंगळुरूच्या भाग्यतेजानं म्हटलंय 'तुम्हा लोकांची मानसिकता कधी बदलेल'... तर मुंबईचा प्रजय बासू म्हणतो 'तुमच्यासारखे किडे गटाराच्या बाहेर येताना दु:ख होतंय'


याआधाही काही तरुणांनी शमीवर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणात तीन जणांना अटकही झाली होती.