मुंबई : सध्या भारतात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती खूप गंभिर आहे. ज्यामुळे भारतात काही राज्यात लॅाकडाऊन लावले गेले आहेत. अशात IPLसुरु असल्याने लोकांचा थोडा विरंगुळा होत आहे. अशातच मैदाना बाहेरुन एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादकडून क्रिकेट खेळणारा 33 वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाजाचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अश्विन यादव (Ashwin Yadav) असे या भारतीय खेळाडूचे नाव आहे. अश्विनचं असे अचानक निघून जाणे त्याच्या पत्नी आणि 3 मुलांसाठी धक्कादायक तर आहेच, तसेच हे भारतीय क्रिकेटसाठी ही धक्कादायक आहे.


अश्विन यादवने आपल्या कारकीर्दीत हैदराबादसाठी 14 सामने खेळला, ज्यात त्याने 34 बळी घेतले. पंजाबविरुद्ध त्याने 2007 मध्ये मोहाली येथे रणजी सामन्यात आपला डेब्यू केला. यादवची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2008-2009 मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बघायला मिळाली, तेव्हा त्याने उप्पल स्टेडियमवर 52 धावा देऊन 6 बळी घेतले.


रणजी कारकीर्द सोडल्यानंतरही तो क्रिकेट खेळाडू म्हणून स्थानिक लीगमध्ये सक्रिय होता. 33 वर्षीय अश्विन यादवने हैदराबादकडून 10 सामने आणि 2 टी-20 सामने खेळले आहे.


भारताच्या फिल्डिंग कोचकडून दुःख व्यक्त


भारताचे सध्याचे फिल्डिंग कोच आर. श्रीधरने अश्विनच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. हैदराबादच्या वेगवान गोलंदाजाचे वर्णन त्याने एक मजेदार प्रेमळ व्यक्ती म्हणून केले आहे. आर. श्रीधर यांनी ट्वीट केले की, अश्विन यादव यांच्या निधनाच्या बातमीने मला दु: ख झाले आहे. तो एक टीम मॅन आहे. तो मजेदार होता. तो एक वेगवान गोलंदाज होता. मी त्याच्या कुटुंबाला हिंम्मत मिळो अशी प्रार्थना करतो. "



राज्यांच्या क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त


श्रीधर शिवाय अनेक राज्यांतील क्रिकेटपटूंनीही अश्विन यादवच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ऑफ स्पिनर विशाल शर्माने अश्विनला एक उत्तम सहकारी जोडीदार म्हणून संबोधले. तो म्हणाला की, "तो एक असा खेळाडू आहे ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. अश्विनच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणे मला अवघड आहे."