नवी दिल्ली : १ जूनपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ४ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीजची चर्चा पाकिस्तानकडून होणार होती. पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं की, दोन्ही देश आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान यावर चर्चा करु शकतात. पण भारताकडून शक्यता पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे.


जोपर्यंत पाकिस्तानात दहशतवाद बाकी आहे तोपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात सिरीज होणार नाही. असं केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी बीसीसीआय आणि पीसीबीच्या दुबईत होणाऱ्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने सरकारशी चर्चो करुन प्रस्ताव दिला पाहिजे. दहशतवाद आणि खेळ एकत्र नाही चालू शकतं असं देखील त्यांनी म्हटलं आहे.  'पाकिस्तानसोबत खेळण्याचा निर्णय सरकारच्या परवानगी शिवाय नाही घेतला जाणार.' असं याआधीच बीसीसीआयने म्हटलं होतं.