Asia Cup 2022 : दुबई येथे होणाऱ्या बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट (India-pakistan Match Ticket) मिळविण्यासाठी क्रिकेट चाहते किती ही पैसे मोजायला तयार आहेत. तिकिटांची पहिली बॅच 15 ऑगस्टला तीन तासांत संपली. IANS ने काही लोकांसोबत चर्चा केली ज्यांना पहिल्या बॅचमध्ये तिकीट खरेदी करण्याची संधी मिळाली. भारतीय नागरिक आणि शारजाहचे रहिवासी असलेल्या सादने सांगितले की, तिकिट मिळविण्यासाठी त्याने अनेक संगणकांवरून तिकीट पोर्टलवर लॉग इन केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सादने म्हटले की, मी सकाळी 8 वाजल्यापासून साइटवर होतो. मी तिकीट विक्रीवरील अपडेट्स शोधले आणि एकाच वेळी चार संगणकांवर वेबसाइट उघडली. मी नशीबवान होतो कारण मी 20 मिनिटांत तिकीट खरेदी करू शकलो. तिकीट काढण्यासाठी सुमारे १००० दिरहम खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. 


तीन सामन्यांच्या बंडलमध्ये तिकिटे उपलब्ध होती. 'मी इतर दोन सामन्यांसाठी जाऊ शकणार नाही आणि ते मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना देईन. साद स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. गेल्या वर्षी झालेल्या T20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी तो एक आहे, पण तो अयशस्वी ठरला.


दुबईचे रहिवासी विशाल सिंह म्हणाले की, ऑनलाइन रांगेत चार तास उभे राहिल्यानंतर त्यांना प्रीमियम तिकीट मिळू शकले. या तिकिटासाठी त्याने 1200 दिरहम पेक्षा जास्त पैसे मोजले. भारत आणि पाकिस्तानचे सामने दुबईत क्वचितच होतात आणि मला ही संधी सोडायची नव्हती, असे ते म्हणाले. 


पहिल्या बॅचची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू झाली आणि तिकीट मिळविण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. दुबईचा रहिवासी असलेला मुस्तफा तिकीट मिळवणाऱ्या काही भाग्यवानांपैकी एक होता, परंतु त्याला आठ तास लॉग इन राहावे लागले. मुस्तफा म्हणाला, 'मी 15 ऑगस्ट रोजी सकाळी पोर्टलवर लॉग इन केले होते आणि ते कधी लाइव्ह होईल ते पाहत होतो. शेवटी, संध्याकाळी तिकीट विक्री सुरू झाली, माझ्या पुढे 500 पेक्षा जास्त असले तरी मला तासाभरात तिकीट मिळाले.


अनेक चाहते, ज्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं तिकिटं मिळालं नसलं तरी अनेकांनी अंतिम आणि सुपर 4 सामन्यासाठी त्यांच्या जागा आरक्षित केली आहे. भारतीय प्रवासी अमरदीप म्हणाले की 'मला खात्री आहे की हे संघ अंतिम फेरीत भेटणार आहेत, आणि फायनलसाठी तिकीट बुक केले आहे, मला तिथे येण्याची आशा आहे.' 


एशिया कप तिकीट भागीदार प्लॅटिनम लिस्टने चेतावणी दिली की तिकिटांची पुनर्विक्री बेकायदेशीर आहे आणि ती आपोआप रद्द केली जाईल. ग्राहकांना दुय्यम तिकीट वेबसाइट किंवा ऑनलाइन विक्री साइटवरून खरेदी न करण्याचा सल्ला दिला जातोय. कारण हे तिकीट प्रवेशासाठी वैध नसेल किंवा रद्द केले जाईल. 


दुबईतील आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची दुसरी तुकडी बुधवारी (17 ऑगस्ट) विक्रीसाठी उपलब्ध होती, परंतु तिकीट खरेदीसाठी नवीन अट जोडण्यात आली आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, भारत-पाकिस्तानची तिकिटे आता फक्त पॅकेजमध्येच उपलब्ध असतील.