मुंबई : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वनडे मालिकेतील अंतिम सामन्यासाठी सज्ज झालीये. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आज दिल्लीत रंगणार आहे. मात्र, या सामन्यात पावसाचा खेळ होण्याची शक्यता आहे. 3 सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाने यापूर्वी टी-20 सिरीजही जिंकली होती. जाणून घेऊया कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे सिरीजमधील अंतिम सामना दोन्ही टीम्ससाठी खास असणार आहे. कारण या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार कमबॅक करत आफ्रिकेचा पराभव केला होता. यामुळे या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. 


दीपक चहरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश करण्यात आला. शिवाय त्याला दुसऱ्या वनडे सामन्यातंही खेळवण्यात आलं. तर शाहबाज अहमदलाही या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आणि या खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यातच विकेट घेतली. अशा परिस्थितीत शाहबाजला तिसऱ्या वनडेतही खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.


तिसऱ्या वनडेसाठी अशी असेल प्लेईंग 11


शिखर धवन, शुभमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, अवेश खान