सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ६ विकेटनं विजय झाला. याचबरोबर ३ टी-२० मॅचची ही सीरिज बरोबरीत सोडवण्यात भारताला यश आलं. पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टी-२०मध्ये पावसामुळे सामना रद्द झाला. त्यामुळे भारताला तिसरी टी-२० जिंकणं आवश्यक होतं. ही मॅच जिंकत भारतानं २०१६ पासून ३ टी-२० मॅचची सीरिज एकदाही न गमावण्याचं रेकॉर्ड कायम ठेवलं आहे. २०१६ पासून भारतानं आत्तापर्यंत ११ वेळा ३ टी-२० मॅचच्या सीरिज खेळल्या. यातल्या ९ सीरिजमध्ये भारताचा विजय झाला तर २ टी-२० सीरिज बरोबरीत सुटल्या. भारत आत्तापर्यंत फक्त एकदाच ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये हरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं आत्तापर्यंत ३ टी-२० मॅचच्या १२ सीरिज खेळल्या आहेत. पहिल्यांदा २०१५ साली भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ३ टी-२० मॅचची सीरिज झाली होती. या सीरिजमध्ये भारताचा २-०नं पराभव झाला होता. पण यानंतर जानेवारी २०१६ पासून ऑक्टोबर २०१८ पर्यंत भारतानं १० वेळा ३ टी-२० मॅचची सीरिज खेळली. यातल्या प्रत्येक सीरिजमध्ये भारताचा विजय झाला. पण ऑस्ट्रेलियानं भारताचं लागोपाठ ११वी सीरिज जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं.


भारतानं पहिली टी-२० मॅच २००६ साली खेळली. पण ३ टी-२० मॅचची पहिली सीरिज भारत १० वर्षांनी म्हणजेच २०१६ साली खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली ही पहिलीच सीरिज भारत ३-०नं जिंकला.


भारत ऑस्ट्रेलियामध्ये तिसऱ्यांदा ३ मॅचची सीरिज


भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसऱ्यांदा ३ टी-२० मॅचची सीरिज झाली. यातल्या पहिल्या दोन सीरिजमध्ये भारताचा विजय झाला तर तिसरी सीरिज बरोबरीत सुटली. 


भारताच्या ३ टी-२० मॅचच्या सीरिज 


विरुद्ध विजयी टीम विजयाचं अंतर वर्ष
ऑस्ट्रेलिया ड्रॉ १-१(३) २०१८
वेस्ट इंडिज भारत ३-०(३) २०१८
इंग्लंड भारत २-१(३) २०१८
दक्षिण आफ्रिका भारत २-१(३) २०१८
श्रीलंका भारत ३-०(३) २०१७
न्यूझीलंड भारत २-१(३) २०१७
ऑस्ट्रेलिया ड्रॉ १-१(३) २०१७
इंग्लंड भारत २-१(३) २०१७
झिम्बाब्वे भारत २-१(३) २०१६
श्रीलंका भारत २-१(३) २०१६
ऑस्ट्रेलिया भारत ३-०(३) २०१६
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका २-०(३) २०१५