जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं दणदणीत सुरुवात केली आहे. भारतानं २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून २०३ रन्सचा डोंगर उभारला आहे. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं फटकेबाजी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा ९ बॉल्समध्ये २१ रन्स करुन आऊट झाला. तर धवननं ३९ बॉल्समध्ये ७२ रन्स केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीममध्ये कमबॅक करणाऱ्या सुरेश रैनाला ७ बॉल्समध्ये १५ रन्स करण्यात आले. विराट कोहली २६ रन्सवर आणि धोनी १६ रन्सवर आऊट झाला. मनिष पांडे २९ रन्सवर आणि हार्दिक पांड्या १३ रन्सवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर डालानं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर क्रिस मॉरिस, तरबेज शम्सी आणि पेहलुक्वायोला प्रत्येकी १ विकेट मिळाली.


टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला तर वनडे सीरिजमध्ये कोहलीच्या टीमनं इतिहास घडवत सीरिज ५-१नं जिंकली. २६ वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज जिंकता आली नाही. यानंतर आता ३ टी-20 मॅचची सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.


अशी आहे भारतीय टीम


रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, एम.एस.धोनी, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा