विराट-रोहितच्या सेंच्युरीमुळे भारताचा धावांचा डोंगर
विराट कोहली आणि रोहित शर्मानं झळकावलेल्या सेंच्युरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.
कानपूर : विराट कोहली आणि रोहित शर्मानं झळकावलेल्या सेंच्युरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. 50 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 337/6 एवढा झाला आहे.
रोहित शर्मानं वनडे कारकिर्दीतली 15वी सेंच्युरी झळकावली. रोहितनं 138 बॉल्समध्ये 147 रन्स केल्या. रोहितच्या या इनिंगमध्ये 18 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहली वनडे क्रिकेटमधली 32वी सेंच्युरी पूर्ण करून आऊट झाला. कोहली 106 बॉल्समध्ये 113 रन्स करून आऊट झाला. विराटच्या इनिंगमध्ये 9 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.
रोहित आणि विराटनंतर धोनी आणि केदार जाधवनं झटपट खेळी करून भारताचा स्कोअर 337 पर्यंत पोहोचवला. धोनीनं 17 बॉल्समध्ये 25 रन्स तर केदारनं 10 बॉल्समध्ये 18 रन्स केल्या.
मुंबईमधली पहिली वनडे गमावल्यानंतर भारतानं पुण्यातल्या दुसऱ्या वनडेमध्ये कमबॅक केलं. कानपूरमध्ये होत असलेली ही सीरिजमधली तिसरी आणि शेवटची वनडे आहे. त्यामुळे ही मॅच जो जिंकेल तो सीरिजवरही कब्जा करेल.