IND vs SL: शुक्रवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला वनडे सामना खेळण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा जिंकता जिंकता पराभव झाला. शेवटच्या 15 बॉल्समध्ये एका रनची आवश्यकता असताना टीम इंडिया ऑल आऊट झाली आणि सामना अनिर्णित राहिला. सामना टाय झाला तेव्हा चाहत्यांना वाटलं की आता सुपर ओव्हर खेळवली जाईल. मात्र तसं झालं नाही. सामना संपल्यानंतर तो टाय झाला असं घोषित करण्यात आलं. मात्र या सामन्यात सुपर ओव्हर का खेळवण्यात आली नाही? आयसीसीचा नियम यावेळी काय सांगतो, हे पाहूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने आठ विकेट्स गमावून 230 रन्स केले. यावेळी टीम इंडिया अवघ्या 47.5 ओव्हर्समध्ये 230 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे सामना अनिर्णीत संपल्यानंतर चाहते सुपर ओव्हरची वाट पाहत होते पण तसं झालं नाही. यामागे आयीसीसचा नियम कारणीभूत होता. 


वनडे फॉर्मेटमध्ये नाहीये आयसीसीचा नियम


आयसीसीचे वनडे फॉर्मेटचे नियम वेगळे आहेत. टी-20 मध्ये जेव्हा सामना टाय होतो तेव्हा सुपर ओव्हर घेतली जाते, पण वनडेमध्ये असं होत नाही. वनडेम्ये सिरीजमधील सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होत नाही. 50 ओव्हर्सच्या फॉर्मेटमध्ये सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरची तरतूद मल्टी टीम टूर्नामेंट्सच्या बाद फेरीसाठी आहे. अशा सामन्यांमध्ये वनडे सामन्यांसाठी सुपर ओव्हर घेण्यात येते जेणेकरून निकाल घोषित केला जाऊ शकतो. यावेळी टीम उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत जाऊ शकते. 


अशा एका मोठ्या सामन्याचं उदाहरण म्हणजे 2019 सालचा वनडे वर्ल्डकप. 2019 सालचा वनडे वर्ल्डकप टाय झाला होता आणि त्यावेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. दरम्यान त्यावेळीही सुपर ओव्हरच्या सामन्यात कोणाताही निर्णय झाला नव्हता. अखेरीस बाऊंड्री काऊंटच्या नियमानुसार, इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आलं होतं. मात्र यावेळीही मोठा वाद झाल्याचं पहायला मिळालं.


तीन वेळा झाली सुपर ओव्हर


वनडेमध्ये आतापर्यंत फक्त तीन वेळा सुपर ओव्हर खेळवण्यात आली आहे. पहिली सुपर ओव्हर 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामन्यात खेळवली गेली. त्याचनंतर 2020 मध्ये पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्याचा निकाल देखील सुपर ओव्हरमध्ये लागला. ICC क्रिकेट विश्वचषक-2023 पात्रता फेरीतील ODI मधील शेवटची सुपर ओव्हर वेस्ट इंडिज आणि नेदरलँड्स यांच्यात झाली.