मुंबई : टी 20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) नंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतीय टी -20 (India T-20 Team) संघाचं कर्णधारपद सोडणार आहे. आता या पदासाठी हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यानंतर आता उपकर्णधार पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार उपकर्णधार पदाच्या शर्यतीत 3 युवा खेळाडू आहेत. यात के एल राहुल, ऋषभ पंत और जसप्रीत बुमराह यांच्या नावाची चर्चा आहे.


आयपीएलच्या या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) कर्णधारपद भूषवणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपली नेतृत्व क्षमता दाखवली आहे. आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये (IPL Point Table) दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल जिंकण्यात यशस्वी झाला तर पंतला टीम इंडिया उपकर्णधार पदाची लॉटरीही लागू शकते



पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) देखील टी -20 संघाच्या उपकर्णधारपदासाठी मोठा दावेदार आहे. केएल राहुलची फलंदाजी पाहता तो जास्त काळ भारतीय संघात खेळू शकतो. राहुलमध्ये पुढील 4 ते 5 वर्षे तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्याची क्षमता आहे.



ऋषभ पंत आणि केएल राहुल व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह टी 20 संघाचा उपकर्णधार बनू शकतो. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा सर्वात हुशार खेळाडू मानला जातो. त्याचं शांत मन हे या खेळाडूच्या चांगल्या कामगिरीचे कारण आहे. विशेष म्हणजे बुमराहला संघात चांगला सन्मान मिळतो.



माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या मते, जर टीम इंडिया भविष्याकडे बघत असेल, तर केएल राहुलला टीम इंडियाची कमान दिली जाऊ शकते. पण रोहित शर्माचा अनुभव आणि त्याचा विक्रम लक्षात घेता हे होणे सध्यातरी कठीण आहे.