T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा वर्ल्ड कप जिंकण्याचा फॉर्म्युला तयार, पाहा संघाची ताकद काय?
INDIA T20 WORLD CUP SQUAD SWOT ANALYSIS : आगामी वर्ल्ड कपसाठी जाहीर झालेली टीम इंडिया नेमकी कशी आहे. संघाकडे कोणती जमेची बाजू आहे? आणि कोणती बाजू कमकुवत आहे? याचं विश्लेषण पाहुया...
Indian team SWOT Analysis : भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) 30 एप्रिल रोजी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप 2024 साठी इंडियन क्रिकेट टीमच्या 15 खेळाडूंची नावे जाहीर केले आहेत. यासोबतच 4 रिझर्व खेळाडूंची नावे सुद्धा बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले. टीम इंडियामध्ये ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि युझी चहल यांची एन्ट्री झालीये तर केएल राहुल याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. भारतीय क्रिकेट संघाच्या स्क्वॉडची घोषणा झाल्यानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि क्रिकेट फॅन्स आपले मतं जाहीर करत आहेत. काही तज्ज्ञांना हा संघ एकदम संतुलित दिसत आहे, तर काही तज्ज्ञ या टीम सिलेक्शनपासून नाखूश आहेत.
टीम इंडियाची मजबूत बाजू
रोहित शर्मा वर्ल्ड कप 2024 मध्ये परत एकदा भारतीय संघाची कॅप्टन्सी करणार आहे. रोहित शर्माची कॅप्टन्सी नेहमीच चर्चेत असते, यामुळे आपल्या कॅप्टन्सीच्या अनुभवाच्या जोरावर रोहित शर्मा पूर्ण सामन्याची स्थिती बदलू शकतो, यामुळे रोहित शर्मा फलंदाज आणि रोहित शर्मा कर्णधार टीम इंडियासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे. दुसरा सर्व्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाच्या गोलंदाजीची कमान सांभाळणार आहे. बुमराह सध्या एकदम चांगल्या फॉर्ममध्ये असून आयपीएलमध्ये आता त्याच्याकडे पर्पल कॅप सुद्धा आहे. यामुळे बुमराह वर्ल्ड कप 2024 मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. यानंतर गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोघं स्पिनर खूप दिवसानंतर एकत्र भारतीय संघात दिसणार आहे, यामुळे 'कुलचा' च्या जोडीवर (कुलदीप - चहल) भारतीय गोलंदाजीची एक मोठी जबाबदारी असणार आहे. यानंतर फलंदाजीत विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव हे दोघं फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीची कमान सांभाळणार आहे. यामुळे विराट आणि सूर्याच्या जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे.
टीम इंडियाची कमकुवत बाजू
भारतीय संघामध्ये अजूनही घातक ऑलराऊंडर नाहीये, जो एकट्याच्या दमावर पूर्ण मॅच बदलू शकतो. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या संघात घातक ऑलराऊंडर आहेत, त्या पद्धतीच्या खेळाडूंची कमी भारतीय संघात भासत आहे. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा हे दोघं फॉर्ममध्ये नाहीयेत आणि शिवम दुबे हा फक्त फलंदाजीवर लक्ष देत आहे. अशा स्थितीत भारतीय संघात एका ताबडतोब ऑलराऊंडरची उणीव ही भासणार आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला सोडून भरोशाची गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाजाचीसुद्धा कमी या इंडियन टीमच्या स्क्वॉडमध्ये दिसत आहे. यामुळे 1 जूनपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा संघ कशाप्रकारची कामगिरी करणार हे बघण्याजोगं असणार आहे.
टी20 वर्ल्ड कप स्क्वॉड 2024 -
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (W), संजू सैमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
रिझर्व खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.