Rohit Sharma likely Miss T20I : टीम इंडिया सध्या बांगलादेशाच्या (IND vs BAN) दौऱ्यावर असून भारताने टेस्ट सिरीज जिंकली आहे. शेर-ए-बांग्ला क्रिकेट स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशाला पराभवाची चव चाखवली. एकीकडे टीम इंडिया (Team India) आनंदात असताना टीमला एक मोठा धक्का देखील बसला आहे. बांगलादेशाच्या दौऱ्यानंतर टीम इंडियाला भारतात श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. याच सिरीज संदर्भात टीमसाठी एक वाईट बातमी आहे. 


टीम इंडियाला मोठा धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुखापतीच्या कारणामुळे टीमचा नियमिक कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 सिरीज खेळणार नाहीये. बांगलादेशाविरूद्ध झालेल्या वनडे सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात नियमित कर्णधार (Rohit Sharma) ला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याने टेस्ट सिरीजमध्ये भाग घेतला नव्हता. अशातच आता याच दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजमधून बाहेर झाला आहे. 


पीटीआयच्या अहवालानुसार, रोहित शर्मा (Rohit Sharma Injury Update) अजूनही त्याच्या दुखापतीतून सावरला नाहीये. त्यामुळे रोहित टी-20 सिरीजमध्ये खेळू शकणार नाहीये.


कर्णधारपद 'या' खेळाडूकडे जाण्याची शक्यता


नुकतंच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या टी-20 सिरीजमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ला कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. त्यामुळे आता हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ला आगामी काळात भारताचा नियमित कर्णधार बनवण्याची शक्यता आहे. 


श्रीलंकेविरूद्ध वनडे आणि टी-20 सिरीज


टीम इंडिया आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीजचा पहिला सामना 3 जानेवारी रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजचं कसं असणार आहे, ते पाहूयात


तारीख                 सामना                जागा


3 जानेवरी            पहिली टी20          मुंबई


5 जानेवरी           दूसरी टी20             पुणे


7 जानेवरी          तीसरी टी20           राजकोट


10 जानेवरी        पहिली वनडे           गुवाहाटी


12 जानेवरी        दूसरी वनडे           कोलकाता


15 जानेवरी        तीसरी वनडे         तिरुवनंतपुरम


टीम इंडियाचा बांगलादेशावर विजय


दुसऱ्या टेस्टमध्ये बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लिन स्वीप दिला आहे.