मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मीराबाई चानूने एक पदक पटकावून दिलं आहे. मात्र लवकरच भारत दुसऱ्या पदकाची कमाई करणार आहे. भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने भारताला अजून एक पदकं निश्चित करून दिलं आहे. शुक्रवारी लव्हलिनाने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी महिलांच्या 69 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लव्हलिनाने तैपईची माजी जगज्जेती निएन चीनवर सरशी साधून मात केली. लव्हलिनाने निएन चीनवर 4-1 ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचं एक पदक निश्चित केलं आहे. आता हे पदकं कोणतं असणार आहे याकडे सर्व भारतीयांची उत्सुकता लागून राहिली आहे. 


लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनणार आहे. त्यापूर्वी भारताच्या मेरी कोमने 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलं जिंकलं होतं. तर बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला यांच्यात ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय ठरणार आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पटकावलं होतं.


तर दुसरीकडे टोकियो ऑलिम्पिकमधून भारतासाठी अजून एक चांगली बातमी आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दिपिका कुमारीने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. दिपिका कुमारीकडून भारताला तिरंदाजीमध्ये पदकाची आशा आहे. तर दिपिका कुमारीसोबत अतून दासनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.