डर्बी : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवत भारतीय संघाने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पॉईंटटेबलमध्ये भारत सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचेही सहा गुण आहेत. मात्र रनरेटनुसार भारताने पहिले स्थान मिळवलेय. 


पाच गुणांसह दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. तर यजमान इंग्लंड चार गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानला तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने ते सातव्या स्थानावर आहेत. तर वेस्ट इंडिजचा संघ तळाला आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघाला अद्याप एकही विजय मिळालेला नाही.