मुंबई : टीम इंडियाचा (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड  (India vs England Test 2021) विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी भारतीय खेळाडू 20 दिवसांच्या विश्रांतीवर आहेत. या कसोटी मालिकेलासाठी अजूनही महिन्याचा अवधी बाकी आहे.  त्याआधी भारताला मोठा झटका लागला आहे. स्टार युवा सलामीवीर शुबमन गिलला (shubman gill) दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे गिलला इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेला मुकावे लागणार आहे. क्रिकबझने याबाबतचे वृत्त दिले आहे. पण याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (india tour england 2021 team india opener shubman gill ruled out due to injury)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिलला नेमकं काय दुखापत झाली आहे, याबाबत नेमकं सांगण्यात आलेलं नाहीये.  पण शुबमनला हॅमस्ट्रिंग किंवा पोटरीला दुखापत असल्याचं म्हटलं जात आहे.  क्रिकबझनुसार गिल जरी मालिकेबाहेर पडला असला तरी, तो टीम इंडियासोबतच राहणार आहे. गिल या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतीतून सावरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहे. 


टेस्ट सीरिजचे वेळापत्रक


पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट


दुसरी टेस्ट, 12 ते 16 ऑगस्ट


तिसरा कसोटी सामना, 25 ते 29 ऑगस्ट


चौथी टेस्ट मॅच , 2 ते 6 सप्टेंबर


पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.


टीम इंडिया :


विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.   


संबंधित बातम्या : 


ICC Test Rankings | WTC Final पराभवानंतर टीम इंडियाला फायदा की तोटा? टॉपला कोण?


अभिमानास्पद! टीम इंडियातील 3 खेळाडूंची अर्जुन तर दोघांची खेलरत्नसाठी शिफारस