मुंबई: टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. के एल राहुल, हिटमॅन रोहित शर्मा यांनी हॉलेटमधील फोटो शेअर केले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे. टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहेत. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका देखील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्याचा सराव करण्यापूर्वी तीन दिवस कडक क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे. या तीन दिवसांमध्ये एकही दिवस खेळाडूंना एकमेकांना भेटता येणार नाही किंवा समोरासमोर अंतर ठेवून देखील बोलता येणार नाही. भारतीय टीमसाठी तयारी करण्यासाठी खूप कमी वेळ असणार आहे. याआधी टीम इंडिया 14 दिवस मुंबईमध्ये क्वारंटाइन राहिली होती.




के एल राहुलने विमानतळावर उतरल्यानंतरचा पहिला फोटो इंग्लंडमधील शेअर केला होता. तर रोहित शर्मानेमधील फोटो शेअर केला आहे. 18 ते 22 जून न्यूझीलंड विरुद्धचा वर्ल्ड चॅम्पियनशिप सामना खेळल्यानंतर 4 ऑगस्टपासून टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध सामना खेळायाचा आहे.