लंडन : श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ७ विकेट्सनं पराभव झाला आहे. या पराभवाबरोबरच भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचं स्वप्न भंगलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सात सामने जिंकल्याचा विक्रम आहे. भारतालाही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग सात सामने जिंकून आठव्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने २००९ पासून आतापर्यंत लागोपाठ सात सामने जिंकले आहेत. टीम इंडियासाठी २००९ साली दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आलेली चॅम्पियन्स ट्रॉफी खूप खराब गेली होती.


२००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं वेस्ट इंडिजला हरवत अखेरचा सामना जिंकला होता. त्यानंतर इंग्लडमध्ये २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने जिंकले होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यानंतर सेमी फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत केले होते. मग अखेरच्या सामन्यात इंग्लडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.