India vs Autralia : वर्ल्डकप आधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (INDvsAUS) 3 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.  (INDvsAUS T-20 Series 2022) वर्ल्डकपआधीचे (T-20 World cup 2022) हे तीन सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. 20 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. उद्यापासून सूरू होणाऱ्या टी-20 सीरिज जिंकण्यासाठी रोहित मोठं मास्टर कार्ड खेळवणार आहे. (Team India Trendig News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये ((Team India) अचानकपणे सर्वात मोठा मॅच विनर परत आला आहे. ऑस्ट्रेलियन टीमही घाबरली असावी. या खेळाडूमध्ये संपूर्ण सामना स्वत:च्या जोरावर फिरवण्याची क्षमता आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून हर्षल पटेल (Harshal Patel) आहे. (Cricket Trending Marathi News) 


हर्षल पटेल हा उत्कृष्ट स्विंग गोलंदाज असून गोलंदाजी स्लोवर चेंडू टाकून तो ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढू शकतो. हर्षल पटेल हा त्याच्या वेगवान फलंदाजीसाठीही ओळखला जातो. हर्षल पटेल (Harshal Patel Austrelia T20 Series) सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये अत्यंत घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो.


हर्षल पटेलमुळे भारताला हार्दिक पंड्यासारखा (Hardik Pandya) एक ऑल राऊंडर खेळाडू मिळाला आहे. हर्षल पटेल 2 महिन्यांनंतर टी-20 संघात पुनरागमन करत आहे. हर्षल पटेलने आपला शेवटचा टी-20 सामना जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. 


नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 सामना खेळल्यानंतर हर्षल पटेल टी-20 संघातून बाहेर पडला होता. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सीरिजमध्ये कशा प्रकारे पुनरागमन करतो याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.