Shubman Gill surpassed Babar Azam: इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यात मोहालीच्या मैदानावरही अर्धशतकीय खेळी केली होती. आज झळकावलेल्या अर्धशतकामुळे त्याने यंदाच्या वर्षात अर्धशतकं झळकावण्याच्या शर्यतीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे. शुभमने सलग दुसऱ्या सामन्यात बाबरचा दुसरा विक्रम मोडीत काढल्याने तो आता आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीमध्ये बाबर आझमला मागे टाकणार का याची चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की वाचा >> त्रिशुळासारखी लाईट, डमरुसारखी ड्रेसिंगरुम अन् 330 कोटी रुपये! मोदींच्या मतदारसंघातील क्रिकेट ग्राऊण्ड पाहाच


सिक्स मारत झळकावलं अर्धशतक


सामन्यातील 14 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर शुभमनने अर्धशतक झळकावलं. अवघ्या 37 व्या चेंडूवर शुभमनने अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे कॅमेरॉन ग्रीनच्या गोलंदाजीवर षटकार लगावत अर्धशतक साजरं केलं. शुभमनने लगावलेला हा षटकारही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



मोहालीमध्येही झळकावलेलं अर्धशतक


मोहालीच्या सामन्यात शुभमनने 63 चेंडूंमध्ये 74 धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. या अर्धशतकासहीत त्याने 2023 मध्ये अर्धशतकं झळकावण्यासंदर्भात बाबरच्या कामगिरीशी बरोबरी केली होती. आजच्या सामन्याआधी बाबर आणि शुभमनच्या नावे प्रत्येकी 8 अर्धशतकं होती. मात्र आज शुभमने आणखीन एक अर्धशतक झळकावत बाबरला मागे टाकलं आणि वर्षभरातील आपलं 9 वं अर्धशतक झळकावलं. 



मागच्या सामन्यात बाबरला याबाबतीत दिली धोपीपछाड


मोहालीच्या सामन्यामध्ये शुभमनने ऋतुराजबरोबर 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप करत सर्वाधिक वेळा 100 हून अधिक धावांच्या पार्टनरशीप करण्याचा बाबरचा विक्रम मोडीत काढला. 2023 मध्ये 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप करण्याचा पराक्रम बाबरने 6 वेळा केला. तर ऋतुराजबरोबरची शुभमनची पार्टनरशीप ही 7 वी 100+ पार्टनरशीप ठरली. आजच्या खेळीनंतरही शुभमन बाबरचं आयसीसी रॅकिंगमधील पहिलं स्थान आपल्या नावे करुन घेतो की काय अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे.



ही बातमी पूर्ण होईपर्यंत भारताचा स्कोअर 21 ओव्हरनंतर 164 वर एक गडी बाद असा होता. भारताची 164 धावासंख्या असतानाच शुभमन हा 58 चेंडूंमध्ये 74 धावांवर खेळत होता.