मुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान जाहीर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसर्‍या दिवशी (IND vs AUS Test Day 3 )टीम इंडिया ३२६ धावांवर ऑलआऊट झाली. भारताकडून अजिंक्य रहाणेने ११२ तर रवींद्र जडेजाने ५७ धावा केल्या.


टीम इंडियाला आघाडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली होती. १९८५ नंतर ऑस्ट्रेलियामधील पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताने आघाडी घेतलेली ही पहिलीच वेळ आहे. या कसोटी सामन्याआधी अॅडिलेड ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावाच्या जोरावर ५३ धावांची आघाडी घेतली होती.


यापूर्वी १९८५-८६ मध्ये डलेडमध्ये खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यातही भारताने आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने केलेल्या १३८१ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ५२० धावा केल्या. मेलबर्न येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने २६२ धावा केल्या त्या उत्तरात टीम इंडियाने ४४५ धावा केल्या. असे असले तरी दोन्ही सामने अनिर्णित राहिले.


ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी


यजमानांकडून मिचेल स्टार्क आणि नॅथन ल्यॉनने तीन-तीन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सला दोन तर जोश हेजलवुडला १ विकेट मिळाली. रवींद्र जडेजाने संयमी खेळी करत १३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आनंद साजरा करताना त्यांने हवेत बॅट तलवारीसारखी फिरवली. ५७ धावा काढून तो बाद झाला. मिशेल स्टार्कने पॅट कमिन्सच्या हाती त्याला झेल देण्यास भाग पाडले.