इंदूर : ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचने भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात दमदार शतक झळकावलेय. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दोनशेपार धावा केल्यात.


सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 


पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया टॉस हरला होता. त्यानंतरही सामन्यातही पराभव पत्करावा लागला.


पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.