बंगळुरु : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर तीन-शून्यने आघाडी घेतली असून आजच्या सामन्याकडे लक्ष लागले आहे. आजचा चौथा सामना दुपारी १.३० वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कर्णधार विराट कोहलीचा संघ सध्या क्रिकेट विश्वात चांगली कामगिरी करत आहे. तसेच कोहलीसोबत महेंद्रसिंग धोनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत असून, हार्दिक पांड्याच्या रूपाने टीम इंडियाला चांगला खेळाडू लाभला. पांड्याने पहिल्या सामन्यात आक्रमक ८३ धावा ठोकल्यानंतर इंदूरमध्ये ७८ धावांची खेळी केली. त्यांने आपली चांगली छाप पाडली आहे.


दरम्यान, दुसरीकडे विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला या मालिकेनंतर अ‍ॅशेस मालिकेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अखेरचे दोन सामने जिंकून संघात चैतन्य निर्माण करण्यावर भर असेल. या संघाला विदेशात सलग ११ पराभवास सामोरे जावे लागले. भारताला रोखण्यासाठी काय डावपेच आखायचे, ही संघापुढील मुख्य चिंता आहे.


संभाव्य टीम  :  
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल.


ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराईट, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस् स्टोयनिस, मॅथ्यू वेड, अ‍ॅश्टन एगर, केन रिचर्डसन, पॅट कमिन्स, नाथन कूल्टर नाईल, अ‍ॅरोन फिंच, पीटर हॅन्डस्कोम्ब, जेम्स फॉल्कनर आणि अ‍ॅडम झम्पा.