बुमराहचं टीम इंडियात पुनरागमन, ऑस्ट्रेलियाच्या संघाने घेतला धसका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ जानेवारीला मंगळवारी पहिली वनडे खेळली जाणार आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ जानेवारीला मंगळवारी पहिली वनडे खेळली जाणार आहे. कंगारू टीम विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ३ वनडे सामन्यांती सीरीज होणार आहे. वनडे सीरीजच्या आधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने जसप्रीत बुमराहचा धसका घेतल्याचं दिसतं आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेला बुमराह पुन्हा एकदा टीम इंडियात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
एरॉन फिंचने म्हटलं की, भारताच्या विरोधात ३ वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये त्याची टीम बुमराह बद्दल आधीच डोक्यात भीती नाही बाळगणार. फिंचच्या मते भारताचा टॉप गोलंदाज बुमराह हा भारतासाठी महत्त्वाची कामगिरी करु शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या टीमला त्यांची ताकद काय आहे यावर अधिक लक्ष देऊन खेळलं पाहिजे.
फिंचने म्हटलं की, मला असं वाटतं की, खेळाडू जितका अधिक त्याचा सामना करेल तरच त्याला कळेल की, बुमराह कशी बॉलिंग करतो.'
डेविड वॉर्नरसोबत फिंच हा ऑस्ट्रेलियासाठी ओपनिंग करतो. तो नक्कीच या सीरीजमध्ये चांगली कामगिरी करु शकतो. बुमराहची बॉलिंग आक्रमक आणि योग्य ठिकाणी पडते. तो त्याच्या रणनीतीवर योग्य प्रकारे काम करतो.
बुमराह 5 महिने दुखापतीमुळे टीममधून बाहेर होता. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध तो पुन्हा संघात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला देखील त्याचं विरोधी संघातलं स्थान माहित आहे. त्यामुळे ते देखील सतर्क आहेत.