विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला. विजयासाठी १२७ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. १२७ रनचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या भारतीय बॉलरनी नाकी नऊ आणले. जसप्रीत बुमराहनं ४ ओव्हरमध्ये फक्त १६ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना आऊट केलं. शेवटच्या २ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६ रनची गरज होती. पण १९व्या ओव्हरमध्ये बुमराहनं फक्त २ रन दिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ रनची गरज होती, पण उमेश यादवला ऑस्ट्रेलियाला रोखता आलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकानं थोडी जबाबदारी दाखवायला हवी होती, असं वक्तव्य मॅचनंतर जसप्रीत बुमराहनं केलं आहे. जसप्रीत बुमराहनं ही खंत व्यक्त केली असली, तरी टीकेचा धनी बनलेल्या उमेश यादवला मात्र त्यानं पाठिंबा दिला आहे.


'असं होणं साहजिक आहे. कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करणे फार आव्हानात्मक असते. ही मॅच कोणत्याही क्षणी कुठल्याही टीमकडे वळू शकली असती. तर क्वचित वेळेस मॅच जिंकण्याची दोन्ही टीमला संधी असते.' असे बुमराह म्हणाला.


'प्रत्येक खेळाडू हा आपल्याकडून चांगली खेळी व्हावी, यासाठीचे प्रयत्न करत असतो. आपल्याकडून शक्य तितके प्रयत्न तो करतो. प्रत्येक खेळाडू हा त्याने आखलेल्या योजनेनुसार खेळतो. काही वेळा तो बॉलर आपल्या योजनेत यशस्वी होतो, तर कधी अपयशी देखील होतो. यासाठी चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. अखेरच्या बॉलवर भारताचा विजय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण तसे होऊ शकले नाही', अशी खंत बुमराहनं व्यक्त केली.


'ऑस्ट्रेलिया टॉस जिंकल्यानंतर, त्यांच्याकडे बॉलिंग किंवा बॅटिंग असे दोन पर्याय होते. पण पहिल्या इनिंग मध्ये भारताला बॅटिंग करावी लागल्याने ऑस्ट्रेलियाला विजयी आकडा देण्याचे आव्हान होते. जेव्हा आपल्याला विजयासाठी एखादा आकडा माहित असतो, तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी असते. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेला आकडा हा फार लहान होता. पण आम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॉटिंग करताना ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक विजयी लक्ष देण्याच्या प्रयत्नातून खेळत होतो.' अशी प्रतिक्रिया बुमराहनं दिली. 


पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव, पण विराट-बुमराहचा विक्रम