भारत वि ऑस्ट्रेलिया : पहिल्या वनडेत झाले हे रेकॉर्ड
भारतीय संघाने रविवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी(डकवर्थ लुईस) हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना २८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावा करणे आवश्यक होते. मात्र त्यांना १३७ धावाच करता आल्या. भारताच्या या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात झाले.
चेन्नई : भारतीय संघाने रविवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी(डकवर्थ लुईस) हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना २८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावा करणे आवश्यक होते. मात्र त्यांना १३७ धावाच करता आल्या. भारताच्या या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात झाले.
१. हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८३ धावांची खेळी केली. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी १८ जून २०१७मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ७६ धावा केल्या होत्या.
२. भारताकडून पहिल्यांदा सहा आणि सातव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांनी ७५ हून अधिक धावा केल्या.
३. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. तो इंग्लंडकडून सर्वाधिक तीन वेळा शून्यावर बाद झाला.
४. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचे तीन आणि चार क्रमांकावर खेळणारे क्रिकेटर शून्यावर बाद झाले. भारताकडून चौथ्यांदा हे घडलंय.