चेन्नई : श्रीलंकेला व्हाईट वॉश दिल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेली विराट सेना आजपासून ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास सज्ज झालीय. दुपारी दीड वाजता चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी सरावादरम्यान फिरकी गोलंदाज अक्षर पटेल जखमी झाल्यानं तीन सामन्यांसाठी बाहेर गेलाय. त्याच्याऐवजी संघात रविंद्र जडेजाला संधी देण्यात आलीय. तर ओपनर शिखर धवन तीन सामने खेळणार नाहीए. 


दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा ओपनर आरोन फिंच जखमी झाल्यानं सामन्याबाहेर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एकूण १२३ वनडे सामने झालेत. त्यापैकी भारत ४१ सामने तर ऑस्ट्रेलिया ७२ सामने जिंकलीय. तर १० सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही.