नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये पून्हा एकदा टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आहे. या मॅचमध्ये मनीष पांडे याने एक जबरदस्त कॅच पकडत सर्वांच लक्ष वेधून घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


एका मोठ्या स्कोरकडे वाटचाल करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाने २९३ रन्सवर रोखलं. यामध्ये भारताच्या बॉलर्ससोबतच फिल्डर्सनेही चांगल प्रदर्शन केलं. खासकरुन मनीष पांडे याने बाऊंड्री लाईनवर एक जबरदस्त कॅच पकडली. ही कॅच सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला.



मॅचच्या ४७व्या ओव्हरमध्ये बुमराहने ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला. बुमराने टाकलेला हा बॉल हँड्सकोंबने मारला. सर्वांनाच वाटलं की सिक्सर जाईल. मात्र, बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या मनीष पांडेने उडी मारत कॅच पकडली.


या दरम्यान मनीष पांडे बाऊंड्रीलाईनच्या बाहेर जाण्यापूर्वी त्याने बॉल हवेत फेकला. मग, बाऊंड्रीलाईन बाहेर गेलेल्या मनीष पांडेने पून्हा मैदानात येत कॅच पकडली.