कोलकाता : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. धोनीचा हा फॉर्म पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी पत्रकारांसोबत बोलताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क याने म्हटलं की, "मला तुमच्यापैकी कुणीही विचारु नका की, धोनी २०१९चा वर्ल्डकप खेळणार की नाही? कारण, धोनी २०२३चा क्रिकेट वर्ल्डकप खेळणार आहे."


मायकल क्लार्कने चेन्नई वन-डे मॅचमध्ये फ्लॉप ठरलेल्या डेव्हिड वॉर्नरचाही बचाव केला आहे. क्लार्कने म्हटलं की, वॉर्नरने बांगलादेशमध्ये सेंच्युरी केली होती. त्यामुळे एका मॅचमध्ये त्याचं प्रदर्शन पाहून त्याला दुर्लक्षित करणं चुकीचं आहे. तो रन्स बनविण्यासाठी वेगळा मार्ग नक्कीच शोधेल.


तर, स्टिव्ह स्मिथ संदर्भात बोलताना क्लार्कने म्हटलं "ऑस्ट्रेलियन कॅप्टन चांगली बॅटींग करत आहेत. मात्र, आता त्यांच्यासमोर कॅप्टनशीपचीही जबाबदारी आहे. कॅप्टन म्हणून त्याच्यासमोर अनेक आव्हान आहेत. मात्र, टीमला यशाच्या मार्गावर त्याला घेऊन जायचं आहे."