रांची : एकदिवसीय क्रिकेट सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या टी २० मालिकेत आज इंडिया आणि ऑस्ट्रेलियात भिडंत होणार आहे. त्यामूळे टीम इंडिया इथेही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे तर ऑस्ट्रेलिया आपल्या फॉर्ममध्ये पुनरागम करण्याच्या प्रयत्नात दिसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या टीमने ऑस्ट्रेलियाला ४-१ असे हरविल्यानंतर आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान प्राप्त केले आहे.  ट्वेंटी -२० रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या भारताचे लक्ष या सिरीजकडे आहे.जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमधून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी करुन इथेही अव्वल राहण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हे वाटते तितके सोपे नसणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाही मजबूत रणनिती घेवून मैदानात उतरणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या चार टी २० सामन्यांमध्ये अर्धशतके काढणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीही या मालिकेसाठी सज्ज झाला आहे.  कोहलीच्या बॅटला रोखण्यासाठी विशेष प्लानिंग केले जाईल. विराट सर्वोत्तम फलंदाज आहे आणि त्याची विकेट खूप मौल्यवान आहे असे ऑस्ट्रेलिया संघाचा यष्टिरक्षक फलंदाज टिम पेन याने कोहली बद्दल सांगितले. त्याच्याशिवाय भारतीय संघात अनेक दिग्गज फलंदाज आहेत ज्यांच्या धावा रोखाव्या लागणार आहेत. उद्याची परिस्थिती बघून रणनिती बनविणार असल्याचेही त्याने सांगितले. 


असा असणार संघ


भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.


ऑस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅन ख्रिस्तियन, नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स, अ‍ॅरोन फिंच, ट्रेव्हिस हेड, मोइसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा.