अॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना
Virat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं?
Virat Kohli, India vs Australia: भारतीय क्रिकेट जगतामध्ये खेळाप्रती असणारं समर्पण आणि कमालीची जिद्द या गुणांमुळं विराट कोहलीचं नाव कायमच प्रकाशझोतात असतं. हाच खेळाडू सध्य एका वेगळ्या कारणानं चर्चेचा विषय ठरत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये पराभवाचा सांमना करावा लागला आणि आता ही मालिका बरोबरीत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघानं विजयी सुरुवात केली. त्याचवेळी विराट कोहलीनं दमदार शतकी खेळीचं प्रदर्शनही केलं. अॅडिलेडमध्ये मात्र तो पहिल्या डावात अवघ्या 7 आणि दुसऱ्या डावात 11 धावांवर बाद झाला. क्रिकेटप्रेमींपेक्षा खुद्द विराटसाठीच हा एक मोठा धक्का ठरला.
अॅडिलेडमधील कसोटी सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर लगेचच विराटनं नव्यानं सुरुवात करत सराव सुरू केला. सामना संपल्यानंतर लगेचच तहान-भूक विसरून तो पुन्हा मैदानात आला आणि इथं त्यानं सराव सुरू केला. सामन्यानंतरही गोलंदाजांच्या चेंडूंचा सामना करत फलंदाजीचा सराव सुरू केला. खेळाप्रतीची त्याची ओढ, आपण कुठेतरी कमी पडलो याची जाणीव आणि आपल्या उणिवांवर काम करण्याची त्याची जिद्द आणि चिकाटी पाहून कधी एकेकाळी क्रिकेटविश्व गाजवणारे सुनील गावस्करही हैराण झाले.
विराटकडून शिकण्यासारखं खूप काही...
फलंदाजीत अडचणी आल्या म्हणून त्या अडचणींवर काम करणाऱ्या विराटला पाहून युवा खेळाडू आणि सर्वांनी विराटकडून शिकण्यासारखं खूप काही आहे, असं गावस्कर म्हणाले. 'आज नेटमध्ये विराटनं पुन्हा एकदा खेळाप्रतीचं त्याचं समर्पण दाखवून दिलं, इतरांकडूनही मी हेच पाऊ इच्छितो'. विराटनं धावा केल्या नाहीत, पण त्यासाठीच तो आता नेटवरही उतरला आहे असं म्हणत त्याच्या या जाणिवेला गावस्कर यांनी सलाम केला.
हेसुद्धा वाचा : "ट्रेव्हिस हेड पत्रकार परिषदेत खोटे बोलला..."; मोहम्मद सिराजने 'त्या' भांडणाबद्दल केला मोठा खुलासा
ऑस्ट्रेलियातील पिंक बॉल कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियानं आपला दबदबा कायम ठेल्याचं पाहायला मिळालं. जिथं या संघानं डगमडलेल्या भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला, ज्यानंतर गावस्करांनीही संघातील खेळाडूंचे कान टोचले. पिंक बॉल कसोटीचा शेवट फार लवकर झाल्यानंतर खेळाडूंनी हॉटेलच्या खोल्यांमध्ये वेळ वाया न घालवता हाती मिळालेल्या जास्तीच्या दोन दिवसांचा वापर सरावासाठी करावा असा सल्ला त्यांनी दिला.
'उरलेल्या तीन कसोटी सामन्यांनाच एक मालिका म्हणून पाहत ही पाच सामन्यांची मालिका आहे हे सर्वांनी विसरून जावं. थोडक्यात संघातील खेळाडूंनी पुढील दिवसांमध्ये सराव करावा कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही हॉटेलवर बसून राहू शकत नाही, कारण तुम्ही इथं क्रिकेट खेळण्यासाठी आला आहात', असं गावस्करांनी स्पष्ट केलं.