India vs Bangladesh: टीम इंडिया सध्या बांग्लादेशच्या (India tour of Bangladesh, 2022) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने देखील खेळले जाणार आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh, 1st ODI) वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला डेब्यूची (kuldeep sen debut) संधी देण्यात आली आणि कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) उमरान मलिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं. न्यूझीलंड दौऱ्यावर खेळलेल्या उमरान मलिकला (Umran Malik) बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून  वगळण्यात आलं होतं. त्यावरून अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड दौऱ्यावर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळत होता. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून परतला. त्यावेळी रोहितने उमरान मलिकला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला. आणि कुलदीप सेनला संधी दिली. त्यामुळे टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये ताळमेळ नसल्याचं चित्र आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटर अजय जडेजा (Ajay Jadeja) यांनी संताप व्यक्त केलाय.


काय म्हणाले जडेजा?


भारतीय संघात एकामागून एक अनेक खेळाडूंना आजमावलं जात आहे आणि हे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. टीम इंडियात एखाद्या क्रिकेटपटूला संधी दिली तर त्याला 3 सामन्यांनंतर बाहेरचा रस्ता दाखवणं ही चांगली गोष्ट नाही. असं करून तुम्ही लग्नातील वऱ्ड्यांची मिरवणूक काढत आहात, असं अजय जडेजा (Ajay Jadeja On Team India) म्हणाले आहेत.


आणखी वाचा - VIDEO : लिटन दासने झेल घेतल्यानंतर विराट झाला अवाक; अशी होती रिअ‍ॅक्शन


दरम्यान, बांगलादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 तर इबादतने 4 बळी घेत भारतीय संघाला गुढघे टेकायला लावले आहेत. भारतीय संघाकडून उपकर्णधार केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक 73 धावांची खेळी केली आहे. मात्र, टीम इंडिया पुर्ण 50 ओव्हर देखील खेळून काढत्या आल्या नाहीत.