इंदूर : इंदूर टेस्टवर टीम इंडियानं मजबूत पकड मिळवलीय. भारतानं 493 रन्सवर इनिंग घोषित केल्यानंतर बांग्लादेशची दुसऱ्या इनिंगमध्ये तारांबळ उडाली. बांग्लादेशनं झटपट 4 विकेट्स गमवल्या आहेत. टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर बांग्लादेशच्या बॅट्समननं पुन्हा एकदा लोटांगण घातलेलं पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरीजमधील पहिला सामना इंदूरमध्ये सुरु आहे. टॉस जिंकल्यानंतर आधी बॅटींग करत बांगलादेशची टीम पहिल्या इनिंगमध्ये १५० रनवर ऑलआऊट झाली होती. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट गमवत 493 रन केले होते. बांगलादेशने दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट गमवत 172 रन केले आहेत. मेहदी हसन मिराज आणि मुश्फिकुर रहीम खेळत आहेत.


टीम इंडियाकडून पहिल्या इनिंगमध्ये मयंक अग्रवालने टेस्ट करिअरमधील दुसरी डबल सेंच्यूरी ठोकली. मयंक अग्रवालने 330 बॉलमध्ये 243 रन केले. अजिंक्य रहाणेने 86, चेतेश्वर पुजाराने 54 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 60 रनची खेळी केली. बांगलादेशच्या अबु जाएदने 4 विकेट घेतले.