Ind vs Ban : जेव्हा जेव्हा भारतीय संघातील Wicket Keeping विषयी चर्चा होते तेव्हा तेव्हा एक नाव निर्विवादपणे पुढे येतं ते म्हणजे संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं (Mahendra Singh Dhoni). अतिशय चपळाईनं विरोधी संघाला चकवत किपींग करणाऱ्या माहिला पाहणं म्हणजे जणू क्रीडाप्रेमींसाठी एक परवणीच. म्हणा आता माही संघात नाही. असं असलं तरीही त्याचा वारसा मात्र संघातील खेळाडू आणि प्रामुख्यानं Keepers ने घेतला आहे. यामध्ये आघाडीवर असणारं नाव म्हणजे ऋषभ पंतचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध बांगलादेश (Ind vs Ban) या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या या खेळाडूनं जी कमाल केलीये ते पाहून खुद्द कर्णधार के.एल. राहुलनंही त्याच्यापुढे हात जोडले. बांगलादेशच्या दुसऱ्या खेळीदरम्यान 47 वं षटक सुरु असतानाच मैदानात असं काही घडलं जे सर्वजण पाहत राहिले. 572 धावांचं लक्ष्य़ गाठण्यासाठी ज्यावेळी नजमुल हसन शंटो आणि जाकिर हसन यांनी बांगलादेशच्या संघाला भक्कम सुरुवात करून दिली तेव्हाच भारतीय संघाकडून उमेश यादवनं (Umesh Yadav) एक कमाल बॉल टाकला आणि नजमुल फसला. त्याच्या बॅटचा बाह्य किनारा त्याला लागला. 


हेसुद्धा वाचा : दुखापतग्रस्त बुमराहकडून Special Video शेअर; वारंवार पाहू लागले नेटकरी 


पुढे थरार वाढला... 


पुढे बॉल पहिल्या स्लीपमध्ये असणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) हातात गेला. पण, त्याला हा झेल अचूकपणे टीपता आला नाही. चेंडू त्याच्या हाताला लागून खाली पडणार इतक्यातच ऋषभ पंतनं मोठ्या चपळाईनं मागच्या मागे हा झेल टिपला आणि इथंच बांगलादेशचा खेळाडू 67 धावांवर गारद झाला. 



पंतनं टिपलेला हा झेल खरंतर दिसतो तितका सोपा नव्हता. पण, त्याच्या बुद्धीचातुर्यानं आणि समयसूचकतेनं मैदान जिंकलं असंच म्हणावं लागेल.