Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघातील (team india) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं मैदानावर आपल्या खेळानं सतत क्रीडाप्रेमींची दाद मिळवली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यानं कायमच आपल्या फॉलोअर्ससोबत असणारं नातंही तितक्यास सुरेखपणे जपलं. गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर असणाऱ्या बुमराहनं (jasprut bumrah video) एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी गोष्ट इतकी खास आहे की अनेकजण तो वारंवार पाहत आहेत. (india fast bowler Jasprit Bumrah recovered from injury shared a video)
'फुल थ्रॉटल', असं कॅप्शन लिहित बुमराहनं शेअर केलेला हा व्हिडीओ तुम्हालाही आवडेल. कारण, दुखापतीतून सावरल्यानंतर तो आता एका सकारात्मक वळणावर आला आहे. जिथं त्यानं दुखापतीला बरंच मागे सोडलं आहे. परिणामी तोच वेगवान गोलंदाजी करणारा जसप्रीत सर्वांना इथे पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडीओ इतका सुरेख आहे, की क्रिकेटप्रेमींसाठी तर तो परवणीच ठरत आहे.
बुमराहचा सध्याचा फॉर्म पाहता आता आराम संपवून तो ऑस्ट्रेलिया सीरिजमधून संघात पुनरागमन करण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो क्रिकेटपासून दूरच आहे. त्यामुळं या काळात तो दुखापतीतून सावरला असेल अशीच आशा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.
आशिया कप सुरु होण्यापूर्वी बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरमुळं बुमराहला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. टी20 सामन्यांसाठी त्यानं ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत पुनरागमन केलं होतं, पण तिथंही त्याच्या दुखापतीनं डोकं वर काढलं. परिणामी त्याला टी20 वर्ल्ड कपसुद्धा खेळता आला नाही. जिथे सहसा अशा दुखापतीतून सावरण्यासाठी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो तिथेच बुमराह मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळातच यातून सावरताना दिसत आहे.
कधी आहे ऑस्ट्रेलियासोबतची मालिका?
पुढच्या वर्षी, 2023 मध्ये फब्रुवारी- मार्च महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीनं बुमराहचं दुखापतीतून सावरणं ही अतिशय मोठी आणि तितकीच दिलासादायक बाब आहे.