50 लाखांचा दंड! India Vs Bangladesh मालिकेच्या Playing 11 मधील क्रिकेटपटू अडचणीत
Player Fined 50 Lakh Rupees: या खेळाडूबरोबरच अन्य सहा जणांनाही दोषी ठरवण्यात आलं असून यासंदर्भातील एक पत्रकच भारत आणि बांगलादेशदरम्यानची कसोटी मालिका सुरु असतानाच जारी करण्यात आलं आहे.
Player Fined 50 Lakh Rupees: भारत आणि बांगदलादेशदरम्यान कसोटी मालिका सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. या मालिकेमध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूला चक्क 50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या खेळाडूसहीत इतर सहा जणांना शेअर मार्केटमध्ये फेरफार करुन ठराविक कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढवल्याचा ठपका ठेवण्यात आला असून याच प्रकरणात हा एवढा मोठा दंड ठोठावला गेला आहे.
कोण आहे हा खेळाडू आणि त्याने काय केलंय?
ज्या खेळाडूला दंड ठोठावण्यात आला आहे त्याचं नाव आहे, शाकीब अल हसन! बांगलादेशच्या या अष्टपैलू खेळाडूने सहा व्यक्ती आणि कंपन्यांच्या मदतीने पॅरामाऊंट इन्शोरन्स कंपनी लिमिटेडच्या शेअर्सचे दर वाढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांगलादेशमधील 1.63 कोटी बांगलादेशी टाका म्हणजेच भारतीय चलनानुसार 50 लाख रुपयांचा दंड बांगलादेश स्क्योरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशनने ठोठावला आहे. हा दंड ज्यांना ठोठावण्यात आला आहे त्यामध्ये शाकिबबरोबरच अन्य तीन कंपन्या असल्याचं बांगलादेश स्क्योरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशनने मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं असून अन्य सहाजणही या प्रकरणात दोषी आहेत.
कोणाला किती दंड?
शाकीब अल हसनला या दंडापैकी 50 लाख बांगलादेशी टाका दंड ठोठावला आहे. तर मोहम्मद अब्दुल खायारला 25 लाख बांगलादेशी टाका, इसहाल कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीला 75 लाख बांगलादेशी टाका, अब्दुल कलाम मतबीरला 10 लाख बांगलादेशी टाका, मोनार्क मार्ट, लावा इलेक्ट्रोड इंडस्ट्रीज आणि झाहीद कमाल या तिघांना प्रत्येकी 1 लाख बांगलादेशी टाका दंड ठोठावण्यात आला आहे. बांगलादेश स्क्योरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशनने त्यांच्या 923 व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला.
कायमच वादात
शाकीब अल हसनचं करिअर कायमच वाद आणि वादग्रस्त राहिलं आहे. अनेक प्रकरणांमुळे तो कायमच टीकेचा धनी ठरला आहे. मात्र यापूर्वी कधीच शाकीब अल हसनला अशाप्रकारे आरोपी म्हणून कोर्टाची पायरी चढावी लागली नव्हती.
हत्येचा खटलाही दाखल
शाकीब अल हसनविरुद्ध खुनाचा खटलाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेअर्ससंदर्भातील प्रकरणात जामीन मिळाला तरी लवकरच त्याला कोर्टात अन्य खटल्यासाठी हजर रहावं लागण्याची दाट शक्यता आहे. शाकीब अल हसन हा याच वर्षाच्या सुरुवातीला माजी राष्ट्राध्यक्ष शेख हसिना यांच्या आवामी लिगच्या तिकीटीवरुन निवडून आला होता. मात्र त्याच्याविरोधात एका कापड कामागाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामागाराचा मृत्यू जुलै आणि ऑगस्टमध्ये देशात झालेल्या हिंसाचारादरम्यान झालेला.