IND vs BAN 2nd odi highlights : बांगलादेशमधील (bangladesh dhaka) ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा यजमान बांगलादेशनं पराभव केला आणि मालिका खिशात टाकली. अवघ्या 5 धावांनी भारतीय संघानं हा सामना गमावला. इथं ज्या खेळाडूवर सर्वांच्याच नजरा टीकल्या होत्या तो विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) त्याची फारशी जादू मैदानात दाखवू शकला नाही. परिणामी आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं कधीही न घेतलेला निर्णय घेतला आणि पाहणारेही अवाक् झाले. 


विराटनं का घेतला असा निर्णय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Team India चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाला. अशा परिस्थितीत शिखर धवनसोबत भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी विराट मैदानात उतरला. आतापर्यंत त्यानं टी20 सामन्यांमध्ये अनेकदा फलंदाजीच्या सुरुवातीलाच हजेरी लावली आहे. किंबहुना विराट भारतीय संघासाठी (team india) एकदिवसीय सामन्यातही पहिल्या स्थानावर फलंदाजीसाठी आला होता. पण, Opener म्हणून त्याला प्रभावी खेळ खेळता आलेला नाही. 


ओपनिंग बॅट्समन म्हणून विराट अपयशी 


विराट कोहली (Virat Kohli) बांगलादेशविरोधातील सामन्यात ओपनिंगसाठी मैदानात आला खला. पण, त्याची ही खेळी सपशेल अपयशी ठरली. 6 चेंडूंमध्ये त्याला फक्त 5 धावाच करता आल्या. या खेळीमध्ये त्यानं एक चौकार मारला. पण, तो एकमेव चौकार फारशी जादू करु शकला नाही. 


हेसुद्धा वाचा : Ind vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो'हिट', 'हा' मोठा रेकॉर्ड केला नावे


दरम्यान आकडेवारी पाहिली असता सुरुवातीला फलंदाजीला आलं असता विराटनं सात सामन्यांमध्ये 23.71 च्या सरासरीनं फक्त 166 धावा केल्या. कारकिर्दीची सुरुवात श्रीलंकेविरोधात केली होती. तर, बुधवारच्या सामन्यापूर्वी त्यानं 2014 मध्ये न्यूझीलंडविरोधात संघासाठी सलामीचा फलंदाज म्हणून भूमिका बजावली होती. 


रोहित शर्मा पुढच्या सामन्यात खेळणार का? 


तिथे विराट फरासा यशस्वी ठरलेला नसतानाच आता बांगलादेशविरोधातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये रोहितच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दुसऱ्या सामन्याच्याच वेळी स्लिपमध्ये झेल घेताना रोहितच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीचं एकंदर स्वरुप पाहता पुढच्या सामन्यातच तो खेळणार की नाही याबाबत प्रश्नच उपस्थित होऊ लागला आहे.