चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. भारतीय संघ फलंदाजी करत असून पहिलाच धक्का संघाला बसला आहे. अवघ्या 19 धावांवर रोहित शर्मा बाद झाला आणि त्याला तंबूमध्ये परतावं लागलं आहे. इंग्लंडनं भारतीय संघासमोर धावांचा भलामोठा डोंगर उभा केला आहे. हा डोंगर पार करण्याचं आव्हान संघासमोर असतानाच आता पहिला धक्का मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मावर अवघ्या 6 धावांवर माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. आर्चरच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला आहे. रोहितच्या बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला आहे. 4 षटकांनंतर भारताची धावसंख्या 1 गडी गमावून 20 धावा. गिल 13 आणि पुजारा 1 धावा करुन क्रीजवर आहेत. 


 



भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानात हा सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी अखेर इंग्लंडच्या पूर्ण संघाला तंबूत धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. पहिल्याच सामन्यामध्ये इंग्लंड संघानं रन्सचा डोंगर रचला आहे. 578 धावांवर इंग्लंडचा संघातील सर्व गडी बाद झाले आहेत. तर भारतीय संघासमोर आता धावांचं मोठं आव्हान असणार आहे.


जसप्रीत बुमराहने नववी वेकेट LBW केली तर बाईस 34 धावा करून माघारी परतला. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी तीन गडी बाद करण्यात यश आलं आहे. 186 षटकांनंतर इंग्लंडने 9 गडी गमावत 567 धावा केल्या. लीच 9 आणि जेम्स अँडरसन खेळत होते. मात्र 578 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परता आला.