मुंबई : इंग्लंडकडून दुसर्‍या वनडे सामन्यात भारताचा 6 विकेटने पराभव झाला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे इंग्लंड टीमने भारताविरुद्धच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. वन डे सीरीचा तिसरा सामना रविवारी पुण्यात खेळला जाणार आहे. दुसरा वन डे सामना झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेअरस्टो आणि स्टोक्सची फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 336 धावा केल्या इंग्लंडने 50 ओवरमध्ये 337 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडने 6.3 ओवर शिल्लक असताना सामना जिंकला. यावरून असा अंदाज बांधता येतो की, भारतीय  गोलंदाजीची पातळी किती खराब आहे. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं.जॉनी बेअरस्टोने 111 बॉलमध्ये 124 आणि बेन स्टोक्सने 52 बॉलमध्ये 99 धावा केल्या.


बेअरस्टोने त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 7 षटकार लगावले. स्टोक्स शतक करत असतानाच आऊट झाला आणि त्याला तंबूत परतावं लागलं. स्टोक्सच्या चार चौकार आणि दहा षटकारांनी सामना विजयाच्या दिशेनं नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 114 बॉलमध्ये 175 धावांची भागीदारी केली. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन (नाबाद 27) आणि डेव्हिड मालन (नाबाद 16) यांनी इंग्लंडला लक्ष्यापर्यंत पोहोचवले.


वीरेंद्र सेहवाग क्रिकबजशी बोलताना  म्हणाले, "भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या स्पिन गोलंदाजांना आपले ओवर करू दिली आणि त्यांच्याविरुद्ध आवश्यक आक्रमक पध्दत स्वीकारली नाही." भारतीय फलंदाज मोईन अली आणि आदिल रशीदविरुद्ध 15 ते 20  धावा केल्या असत्या तर इंग्लंडला 350 च्या वरच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे झाले नसते, असे सेहवाग म्हणाला. 


वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाले, "इंग्लंडसाठी बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्याच चेंडूवरुन भारतीय फिरकी गोलंदाजांना सेट होऊ दिले नाही आणि त्यांच्याविरुद्ध शॉट मारले."कृणाल आणि कुलदीपची कामगिरी विशेष नसल्यानं नाराजी व्यक्त केली आहे.