लंडन : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत  (India vs england 4th test)  शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur)  बॅटिंगने धमाकेदार खेळी केली. शार्दुल टीम इंडिया अडचणीत असताना मैदानात घट्ट पाय रोवून उभा राहिला. शार्दुलने 72 चेंडूत 60 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान शार्दुलने सामन्यात सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. शार्दुलने 65 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. याआधी या सामन्यातील पहिल्या डावात शार्दुलने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. शार्दुलने ही दोन्ही अर्धशतकं खेळी निर्णायक क्षणी केली. त्यामुळे शार्दुलचं कौतुक केलं जातंय. (India vs england 4th test day 4 shardul thakur scored fifty in boths innings) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी 


टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची शानदार सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसखेर भारताने  3 विकेट्स गमावून 270 धावा केल्या. त्यानंतर चौथ्या दिवसाची चांगली सुरुवात झाली. मात्र रवींद्र जाडेजा 17 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आला तसाच परत गेला. रहाणेला भोपळाही फोडता आला नाही.  विराट कोहलीचं अर्धशतकही 6 धावांनी हुकलं. विराटने 44 धावा केल्या. विराट आऊट झाल्याने टीम इंडियाची 312 वर 6 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूरने टीम इंडियाचा केवळ डावच सावरला नाही, तर चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.