मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी आता फक्त 100 दिवस उरले आहेत. त्याआधी टीम इंडिला इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे 3 सामन्यांची इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिज सुरू आहे.  ही सीरिज टी 20 वर्ल्ड कपच्या मालिका टीम इंडियासाठी खूप महत्वाची असणार आहे.त्या तयारीच्या दृष्टीनं प्रत्येक सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगली कामगिरी करणाऱ्यांनाच संधी दिली जाणार आहे. पहिल्या T20 सामन्यातही असेच काहीसे घडले. रोहित येताच त्याने सतत फ्लॉप होणाऱ्या वेगवान गोलंदाजाला टीममधून बाहेर काढले.


आवेश खान आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियासाठी खेळला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो फ्लॉप ठरला, त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं. आवेश खानसाठी टीम इंडियात पुनरागमन करणं खूप कठीण जाणार आहे. तो गेल्या काही काळापासून अत्यंत वाईट फॉर्ममधून जात आहे. 


आवेश खानने भारतासाठी आतापर्यंत 8 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सीरिजमध्येही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. चार सामन्यांत त्याला फक्त 4 विकेट घेता आल्या. 


आयपीएल 2022 चा स्टार खेळाडू आवेश खान आतापर्यंत टीम इंडियामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याचे ही वाईट कामगिरी त्याच्यासाठी धोक्याची ठरू शकते. त्याला इंग्लंड विरुद्ध सीरिजमध्येही संधी देण्यात आली नाही. रोहित शर्मा आणि निवड समितीने त्याला बाहेरच ठेवल्याच दिसत आहे.