Ind vs Eng 3rd ODI: भुवी ठरला गेम चेंजर, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पलटवली बाजी
इंग्लंडला जिंकवण्यासाठी कुरेनचे प्रयत्न सुरू होते. पण भुवनेश्वर कुमारच्या एका ओव्हरनं त्याचे मनसुखे आणि विजयाकडे निघालेला खेळ दोन्ही उलथवून टाकला.
मुंबई: वन डे सीरिजमधीस शेवचा सामना खूपच रोमांचित आणि अटीतटीचा होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये संपूर्ण खेळाचा माहोल बदलला आणि 7 धावांनी टीम इंडियाचा विजय झाला. सामन्याच्या शेवटच्या काही ओव्हरमध्ये एक वेळ अशी आली की इंग्लंड संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. मात्र त्याला रोखून ठेवण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना यश आलं. एकेकाळी इंग्लंड सामन्यात बळकट स्थितीत होता आणि सॅम कुरेन क्रिझवर तुफान फलंदाजी करत होता.
इंग्लंडला जिंकवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. पण भुवनेश्वर कुमारच्या एका ओव्हरनं त्याचे मनसुखे आणि खेळ दोन्ही उलथवून टाकला. रविवारी भारताने थरारक सामन्यात इंग्लंडला 7 धावांनी नमवून तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1ने जिंकली.
भुवी ठरला गेम चेंजर भुवनेश्वर कुमारने सॅम कुरेनला 48 व्या ओव्हरमध्ये तुफान खेळण्याची संधीच दिली नाही. 47 ल्या ओव्हरमध्ये शार्दुलच्या गोलंदाजीवर त्याने 18 धावा कव्हर केल्या. त्यामुळे इंग्लंड विजयाच्या जवळ पोहोचला होता. 48 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने केवळ 4 धावा कुरेनला मिळू दिल्या. भुवनेश्वर कुमारच्या या ओव्हरनं भारताला खरोखरच पराभवापासून वाचवले आणि वन डे मालिकेत भारताचा विजय झाला.