बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टचा पहिला दिवस भारताचा राहिला. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडनं दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं ९ विकेट गमावत २८५ रन केल्या. आर. अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडनं अक्षरश: लोटांगण घातलं. अश्विननं इंग्लंडच्या ४ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीला २ आणि उमेश यादव इशांत शर्माला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ८० रन केल्या. तर जॉनी बेअरस्टोला ७० रनवर उमेश यादवनं बोल्ड केलं.


इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. टी-२० आणि वनडे क्रिकेट सीरिजमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला अश्विनऐवजी टीममध्ये संधी देण्यात यावी, अशी मागणी होत होती. पण विराट कोहलीनं अश्विनवर विश्वास दाखवला आणि कुलदीपला टीममध्ये स्थान मिळालं नाही. अश्विननंही विराट कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत इंग्लंडला एकमागोमाग एक धक्के दिले.


स्कोअर कार्ड पाहण्यासाठी क्लिक करा