इंग्लंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्याआधी टीम इंडियासाठी बॅडन्यूज
भारतीय टीमपुढे मोठं आव्हान
नॉटींघम : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज पहिला वनडे सामना रंगणार आहे. वनडेमधील दोन सर्वात श्रेष्ठ टीममध्ये आज सामना रंगणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्य़ा वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून या सिरीजकडे पाहिलं जात आहे. ट्रेंटब्रिजची पिच इंग्लंडच्या फलंदाजांना आवडते. या पिचवर 2 वेळा इंग्लंडने 400 हून अधिकचा स्कोर उभा केला आहे. भारतीय टीमला सामन्याआधी जबरदस्त झटका लागू शकतो. वनडे सीरीजमध्ये भारतीय स्पिनर्सच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असेल पण फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवेल तर पाठीच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार देखील पहिला सामना खेळतो की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.
भारतीय टीमचा उपकर्णधार रोहित शर्माने म्हटलं की, लोकेश राहुल छोट्या फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. त्याने आपली जागा टीममध्ये निश्चित केली आहे. पण इंग्लंड विरुद्ध सामन्यात तीन सामन्यांच्य़ा या सिरीजमध्य़े कर्णधार विराट कोहली त्याला कोणत्या क्रमावर खेळायला पाठवतो हे पाहावं लागेल.
कोहली तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करतो. पण राहुलने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वन डाऊनला चांगली बॅटींग करत सगळ्यांनाच प्रभावित केलं आहे. आयरलँड आणि इंग्लंड विरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये कर्णधार विराट चौथ्या स्थानावर बॅटींग करण्यासाठी आला होता. पण 50 ओव्हरच्या सामन्यात तो कोणत्या स्थानी उतरतो हे पाहणं उत्सूकतेचं ठरणार आहे.
ब्रिस्टलमध्ये तिसऱ्या टी20 मध्ये बाहेर झाल्यानंतर कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकतं. मुंबईच्या रोहित शर्माला मोठा स्कोर उभा करावा लागणार आहे. त्याने म्हटलं की, 'टीम हे डोक्यात ठेवून मैदानात नाही उतरणार की 400 पेक्षा अधिकचं टार्गेट इंग्लंडला द्यायचं आहे.' काही दिवसांपूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 481 रनचा रेकार्ड स्कोर बनवला होता.