मुंबई : टीम इंडीया सध्या इंग्लंड़ विरुद्ध 5 टेस्ट मॅचच्या सीरीजची चौथी मॅच करत आहे. परंतु या संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चमकदार कामगिरी केली आहे. यासह आता जसप्रीत बुमराहने भारताकडून खेळताना एक मोठा विक्रम केला आहे.


बुमराहने इतिहास रचला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतासाठी एक विक्रम केला आहे, जे आतापर्यंत मोठे मोठे  गोलंदाज करु शकले नाही ते बुमराहने करुन दाखवले आहे. बुमराह भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.


बुमराहने केवळ 24 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याच्यापेक्षा वेगवाने हा विक्रम आतापर्यंत कोणी करू शकलेला नाही. या प्रकरणात बुमराहने मोठ्या नामवंत गोलंदाजांना मागे टाकले आहे.


कपिल देवही मागे


बुमराहने सर्वात वेगवान 5 विकेट घेण्याच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवलाही मागे टाकले आहे. कपिल देवने 25 कसोटी सामन्यांमध्ये 100 बळी घेतले होते, याशिवाय इरफान पठाणने 28 सामन्यांत 100, मोहम्मद शमीने 29 सामन्यात 100, जवागल श्रीनाथने 30 आणि इशांत शर्माने 33 सामन्यात 100बळी घेतले. पण आता जसप्रीत बुमराह या सर्व दिग्गज गोलंदाजांच्या पुढे आहे.


ऑली पोपला बाद करत रचला इतिहास 


जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या ऑली पोपला बोल्ड करत 100 विकेट्स मिळवण्याचा विक्रम केला आहे. खास गोष्ट म्हणजे बुमराहने आपली पहिली आणि 100 वी विकेट फक्त बोल्ड द्वारे घेतली. बुमराहने महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करून पहिली कसोटी विकेट घेतली होती.


टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा पराभव केला. मात्र, तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने पुनरागमन केले आणि एकतर्फी पद्धतीने सामना जिंकला आणि मालिका 1-1 ने बरोबरीत आली. आता दोन्ही संघ चौथ्या कसोटीत आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.