मुंबई: राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू आणि इंग्लंड संघाचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरची दुखापत पुन्हा डोकं वर काढत होती. हाताच्या दुखापतीमुळे जोफ्राला खूप जास्त त्रास होत होता. त्याच्यावर आता दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने याबाबत बुधवारी माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोफ्रा आर्चर मैदानात केव्हा परतणार याबाबत अद्याप बोर्डकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र जोफ्रा भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज होणाऱ्या सामन्यांमध्ये सुरुवातीचे सामने अनुपस्थित असेल असं सांगितलं जात आहे. 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी टीम इंडिया 2 जून रोजी भारतातून इंग्लंडला जाणार आहे. 


ईसीबीच्या निवेदनानुसार, 'इंग्लंड आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला कोपराची समस्या ही खूप दीर्घकाळापासून सुरू आहे. याआधी त्याच्या हातातून काचेचा तुकडा बाहेर काढण्यात आला होता. आता पुन्हा एकदा दुखापत सुरू झाल्यामुळे त्याच्या हातावर सर्जरी करण्यात आली आहे. 4 आठवड्यानंतर जोफ्राच्या प्रकृतीतील सुधारणा पाहून पुढचे निर्णय घेतले जाणार असल्याचं इंग्लंड बोर्डनं सांगितलं आहे. 


माजी वेगवान गोलंदाजाचं जसप्रीत बुमराहबद्दल मोठं विधन, व्यक्त केली चिंता


टी 20 वर्ल्डकप आधी जोफ्रा आर्चर एकदम फीट असेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या वर्ल्डकपसाठी जोफ्रा इंग्लंडक़डून खेळू शकतो. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजसाठी जोफ्रा खेळणार की नाही याबाबत अद्याप प्रश्नाचिन्हं कायम आहे. 


जोफ्रा आर्चरने इंग्लंडकडून 13 टेस्ट, 17 वन डे आणि 12 टी 20 सामने खेळले आहेत. मार्चनंतर जोफ्रा फक्त 2 सामने खेळला आहे. आता भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये जोफ्रा पुन्हा कधी मैदानात उतरतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.