India vs England : इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या (Rajkot Test) मैदानावर खेळवला जाईल. अशातच आता विराट कोहली आणि केएल राहुल खेळणार नसल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.  अशातच आता इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची मदार युवा फलंदाजांच्या खांद्यावर असणार आहे. अशातच आता तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला (Sarfaraz khan) संधी मिळण्याची शक्यता आहे. नेमकी टीम कॉम्बिनेशन कसं असेल? याची चर्चा होताना दिसते. (Will Sarfaraz khan play in IND vs ENG 3rd Test?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असेल. तर मालिकेत व्हाईस कॅप्टन असलेला जसप्रीत बुमराह देखील आगामी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची बाजू कमकूवत झालीये. रजत पाटीदार, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या युवा गोलंदाजांना संधी मिळेल का? हे पहावं लागेल. तर केएस भरतला बाकावर बसावं लागले. त्याचबरोबर नव्या कोऱ्या आकाश दीपला करियर प्रज्वलन करता येईल का? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरेल.


संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (C), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/आकाश दीप, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.


शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.


भारत Vs इंग्लंड कसोटी वेळापत्रक -


तिसरी कसोटी सामना : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी सामना : 23-27 फेब्रुवारी, रांची 
पाचवी कसोटी सामना : 7-11 मार्च, धर्मशाला.