दुबई : आशिया कपमध्ये आज टीम इंडियाचा दुसरा सामना हाँगकाँगशी रंगणार आहे. या सामन्याच टॉस हाँगकाँगने जिंकला आहे. हाँगकाँगने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे टीम इंडिया प्रथम बॅटींग करणार आहे. आता टीम इंडिया प्रथम बॅटींग करून किती धावांचा डोंगर उभारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया चषक 2022 मधील हाँगकाँगचा हा पहिलाच सामना आहे, तर टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला होता. जर टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली तर सुपर 4 मध्ये आपले स्थान निश्चित होईल. आतापर्यंत फक्त अफगाणिस्तानचा संघ सुपर ४ मध्ये दाखल झाला आहे. अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमधील त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत.


हार्दिक पांड्याला विश्रांती


टीम इंडियाने या सामन्यात बदल केला असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, हार्दिक पांड्या पुढील स्पर्धेसाठी संघासाठी आवश्यक आहे, त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतने संघात प्रवेश केला आहे


हाँगकाँग संघ 
निझाकत खान (कर्णधार), यासीम मोर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेनी (डब्ल्यूके), जीशान अली, हारून अर्शद, एहसास खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला.


टीम इंडिया संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.