गुवहाटी : कसोटी मालिकेपाठोपाठ विराट कोहलीचा भारतीय संघ एकदिवसीय़ मालिकेतही शानदार कामगिरी करण्यास सज्ज आहे. भारत आणि विंडीज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज गुवहाटीत रंगत आहे. भारताने टॉस जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात भारताकडून ऋषभ पंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आता महेंद्रसिगं धोनी आणि ऋषभ पंत या दोघांपैकी यष्टीरक्षकाची जबबादारी कोण सांभाळणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. कॅरेबियन संघाला कसोटीत भारताकडून सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे याची कसर ते एकदिवसीय मालिकेत भरुन काढण्यास प्रयत्नशील असेल. 


भारतीय संघाची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशीच होतेय. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी सलामी देणार की, कॅरेबियन संघ भारताला पराभवाचा धक्का देणार ते पाहण महत्त्वाचं ठरेल. 


भारतीय टेस्ट टीमचा विकेटकीपर ऋषभ पंत आज वनडेमध्ये डेब्यू करत आहे. भारतासाठी वनडे खेळणारा तो 224वा खेळाडू आहे. याआधी दीपक चहरने आशिया कपमधून डेब्यू केलं होतं. मनीष पांडे टीममधून बाहेर झाला आहे. तर खलील अहमदला देखील संधी मिळालेली नाही.



वेस्टइंडीजच्या टीममध्य़े 2 खेळाडू डेब्यू करत आहेत. ओशैन थॉमस आणि चंद्रपॉल हेमराज यांनी चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांना टीममध्ये संधी मिळाली आहे.


भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अम्बाती रायडू, महेंद्र सिंह धोनी, ऋषभ पंत, रविन्द्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद शमी


इंडिज: सुनील एम्ब्रिस, कियरन पॉवेल, शाई होप (विकेटकीपर), शिमोन हेटमीर, मार्लन सैमुअल्स, रोवमन पॉवेल, जेसन होल्डर (कर्णधार), एशले नर्स, केमो पॉल, देवेंद्र बिशू, केमर रोच, फैबियन एलन, ओबेड मैककोय, ओशाने थॉमस, चंद्रपुर हेमराज