मुंबई : भारत आणि आयर्लंड यांच्यातील T20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हार्दिक पांड्याने टॉस जिकलेला आहे. पांड्याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आयर्लंडला प्रथम बॅटींग करावी लागणार आहे. आता पहिली बॅटींग करत आयर्लंड किती धावांचा डोंगर उभारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयर्लंडविरुद्ध प्रथमच कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली आहे.हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकला प्रथम फलंदाजी करायची होती, पण अचानक पाऊस आल्याने त्याने गोलंदाजीचा निर्णय़ घेतलाय. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व भारतीय चाहत्यांना याची उत्सुकता लागली आहे.  


प्लेइंग  11
भारत: ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, उमरान मलिक


आयर्लंड: पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, जोशुआ लिटल, कोनर ओल्फर्ट