मुंबई : ऋषभ पंतला क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये फारसे यश मिळत असल्याचं दिसत नाही. आता आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियामध्ये त्याच्या जागी एक स्टार विकेटकीपर आणि फलंदाज निवडला आहे. जो काही बॉलमध्ये अख्खा सामना फिरवू शकतो. हा खेळाडू ऋषभ पंतच्या कारकिर्दीसाठी मोठा धोका ठरू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून संजू सॅमसन खेळताना दिसणार आहे. तो आपल्या झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. मिडल ऑर्डसाठी संजू एक महत्त्वपूर्ण खेळाडू ठरू शकतो. तो उत्तम विकेटकिपिंग देखील करतो.


दुसरीकडे पंतला तो कडवी लढत देत आहे. पंत सध्या फ्लॉप शो करताना दिसत आहे. आयर्लंड दौऱ्यात सॅमसनची चांगली कामगिरी राहिली तर पंतचं टीम इंडियातील स्थान धोक्यात येऊ शकतं हे निश्चित. 


संजू सॅमसनने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. राजस्थान टीमला प्लेऑफपर्यंत पोहोचवलं. गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र संजूने कमालिची कामगिरी केली. त्याने 17 सामन्यात 458 धावा केल्या. त्याला टी 20 वर्ल्ड कपमध्ये देखील खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. 


दक्षिण आफ्रिका विरुद्ध सीरिजमध्ये पंतचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. पंतला फार चांगली कामगिरी करता आली नाही. तीन टी 20 सामन्यात पंतला 40 धावा जेमतेम करता आल्या. अशा परिस्थितीमध्ये संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये संधी मिळाली आणि त्याने त्याचा फायदा घेतला तर पंतच्या करिअरवर टांगती तलवार येऊ शकते. त्याचं करिअर धोक्यात येऊ शकतं हे निश्चित आहे.